माझी नैतिकता ही माझ्या जनतेसोबत आहे. माझ्या नैतिकतेनुसार मी दोषी नाही. मी जर दोषी असेल, तर दाखवून द्या, मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराड सोबत धनंजय मुंडे याचे संबंध आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. राजीनाम्याचा दबाव वाढत असतनाच मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. या दरम्यान त्यांनी केंद्रीय मंत्री पल्हाद जोशी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रत्रकारांशी संवाद साधला. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मला टार्गेट केले जात असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या संदर्भात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची माझी देखील मागणी असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी जर दोषी वाटत असेल तर राजीनामा मागावा. तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र, केवळ विषय काढून राजीनामा मागितला जात असेल तर काय बोलणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय हेच माझ्या राजीनामा मागू शकतात. त्यामुळे सर्व गोष्टी क्लियर राहायला पाहिजे, असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे. मी पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता गेले 51 दिवस या प्रकरणात ट्रायल चालू आहे. त्याचे टार्गेट मी आहे. मी पार्टीचा निक्षावंत कार्यकर्ता आहे. मी पार्टीचा स्टार प्रचारक म्हणून निवडणुकीच्या काळात टीका केल्या असतील. आणि टीका सहनही केल्या असतील. महायुतीच्या प्रचारासाठी आम्ही आमच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचार केला असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून आमदार सुरेश धस यांचा प्रचार केला असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तर निवडणुकीनंतर प्रचारातील मुद्दे नंतर विसरून जायचे असतात, असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे. माझा दोष नैतिकतेने मला दाखवावा तर लागेल ना? माझी नैतिकता माझ्या लोकांच्याबद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडली आहे, त्या घटनेबद्दल मी जे बोललो ते अतिशय प्रामाणिकपणे बोललो आहे. याबाबतीत मी कुठेच कोणताच दोष असल्याचे मला माझ्या नैतिकतेने वाटत नाही. त्यामुळे माझा दोष नैतिकतेने मला दाखवावा तर लागेल ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझे केवळ एवढेच म्हणणे असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. फडणवीस देखील दिल्लीत येणार असल्याचे माहिती नव्हते दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आले आहात का? या प्रश्नावर देखील धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले. महाराष्ट्रातून दिल्ली साठी निघालो त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत येणार असल्याचे मला माहिती नव्हते. मी केवळ केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांना भेटण्यासाठी दिल्लीत आलो असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. या माध्यमातून महाराष्ट्रातील माझ्या विभागासंदर्भात नागरिकांच्या काही समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी मी दिल्लीला आलो असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply