त्यामुळं लोकसभा निवडणुकीत झालेला गोंधळ यंदा विधानसभा निवडणुकीत टाळता येणार आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगानं मोठा दिलासा दिला आहे. ‘तुतारी’बाबत आयोगानं महत्वाचा निर्णय दिला आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत झालेला गोंधळ यंदा विधानसभा निवडणुकीत टाळता येणार आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.
निवडणूक आयोगानं काय दिला निर्णय?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं निवडणूक आयोगाकडं विनंती केली होती की, ‘Trumpet’ या चिन्हाचं मराठी भाषांतर तुतारी असं करण्यात आलं आहे. हे भाषांतर चुकीचं असून ते रद्द करण्यात यावं. कारण आमच्या पक्षाचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस याच्याशी ते जुळत असल्यानं मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. यामुळं लोक चुकून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाऐवजी Trumpet या चिन्हावरील उमेदवाराला मतदान करत आहेत. त्यामुळं या चिन्हाचं मराठीतील ‘तुतारी’ हे भाषांतर रद्द करुन ‘ट्रम्पेट’ असं करण्यात यावं.
दरम्यान, निवडणूक आयोगानं शरद पवारांच्या पक्षाची ही विनंती मान्य करत, Trumpet या वाद्याच्या चिन्हाचं भाषांतर ‘ट्रम्पेट’ असं करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला यामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच यामुळं निर्माण होणारा मतदारांमधील गोंधळही दूर होणार आहे.
Leave a Reply